चिपळूण : कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा उत्सव. या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला असून गावागावातून आता देवीचे खेळी भोवनीसाठी गावा बाहेर पडले आहेत. चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवतेचे खेळी सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी भोवानीसाठी बाहेर पडले असून ते आता होळी पौर्णिमेला पुन्हा गावात दाखल होतील.
पूर्वीपासून सुरू असलेली शिमगा उत्सवातील ही परंपरा आजही गावा गावातून सुरू असल्याचे दिसून येते. शिमगा उत्सव सुरू झाला की होळी पौर्णिमेच्या आधीच ग्रामदेवतेचे खेळी गावाबाहेर पडतात. देवीच्या नावाने बाहेर पडलेले खेळी तीन ते चार दिवस बाहेरच मुक्काम करत असतात. यावेळी खेळीमंडळी सोबत संकासूर हे खास आकर्षण असते. लहान मुले संकासुराला बघून घाबरतात. तर बाकी सर्व याला आदराने वंदने करतात. ही पारंपरिक प्रथा अनेक वर्ष सुरू असून देवाचे खेळी म्हणून यांना मोठा मान दिला जातो.
बामणोली येथील खेळी बाहेर पडल्यानंतर प्रथम देवाचा मंडप येथे सचिन ओक यांच्या निवासस्थानी खेळी मंडळी थाप मारते. त्यानंतर चिवेली गावामध्ये प्रस्थान करतात. पुढे गोंधळे, नवरतवाडी अशी गाव घेत ते पुन्हा होळी पौर्णिमेच्या आधीच गावात दाखल होतात. त्यामुळे शिमग्याची धामधूम सुरू झाल्याने आता चाकरमानी यांचीही पाऊले गावाकडे वळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 10/Mar/2025














