देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील येथील कसबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे दि. ११ मार्च रोजी सकल हिंद समाज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म रक्षण दिनानिमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
या बाबतची माहिती भाजपाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी दिली आहे. हा कार्यक्रम भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून होणार आहे. यामध्ये सिंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे व प्रमुख सादरकर्ते प्रा. शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांच्यासह ‘छावा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे विकी कौशल यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला लाभण्याची शक्यता आहे, शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव हे शंभूराजे पोवाडा सादर करणार आहेत.
कर पल्लवी डॉ. अमित शिंदे तसेच संगीत संयोजन विकास मारुती कोकाटे, दांडपट्टा चंद्रकांत साठे आणि शेवटी शंभू महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री नितेश राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, प्रमोद जठार, चिपळूणचे आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, उपस्थित राहणार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यानिमित्त शास्त्री पूल येथे मुख्य कार्यक्रम होणार असून यानंतर थेट स्मारकाला भेट व धार्मिक विधी तसेच महाआरती कसबा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला सकल हिंदू संघटना व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सर्व हिंदू संघटना व शंभूराजे प्रेमानी सहभागी होण्याचे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वरच्या वतीने करण्यात आलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 11/Mar/2025














