आंबा बागेत नेपाळी कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या आडीफाटा शिरगाव येथील बागेत नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार, ९ मार्च रोजी रात्री ९ वा. सुमारास घडली. भिमबहाद्दूर बम (३५, मूळ रा. कैलाळी, नेपाळ सध्या रा. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. भिमबहादूर बम हा खबर देणार यांच्या आडी फाटा शिरगाव येथील आंबा काजूच्या बागेत रविवार सायंकाळी ६ वा. सुमारास उताणी अवस्थेत पडलेला दिसून आला. खबर देणार यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Mar/2025

Happy journey