राजापूरचा आठवडा बाजार शनिवारी भरणार

राजापूर : शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार १३ मार्च रोजी होळी उत्सव असल्यामुळे शनिवार दि. १५ मार्च रोजी भरणार असल्याचे राजापूर नगर परिषदेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या वर्षी श्री देव धूतपापेश्वराची होळी १२ मार्च रोजी राजापूर शहरात नाचवली जाणार आहे. १३ रोजी गणेशविसर्जन घाट येथे होम पेटवण्यात येणार आहे. १४ रोजी प्रसिद्ध राजहोळी नाचवली जाणार असल्यामुळे आठवडा बाजार १५ रोजी भरवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 11/Mar/2025