रत्नागिरी : तालुक्यातील देऊड लावगण येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार ९ मार्च रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास करण्यात आली. उदय सदाशिव देसाई (६१, रा. देवूड लावगण देसाईवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस कॉस्टेबल प्रिया सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा त्याच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना आपल्या पुढ्यात संत्रा देशी दारुची बाटली ठेवून बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 11/Mar/2025














