रत्नागिरी : शहरानजीकच्या पांडव नगर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. या बाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोहनसिंह मकनसिंह दसाणा (४९, मुळ रा. राजस्थान सध्या रा. पांडवनगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्याच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवार ९ मार्च रोजी सोहनसिंह हा आंघोळ करुन आल्यानंतर कपडे घालत असताना त्याचा अचानकपणे चक्कर येउन तो बेशुध्द पडला. त्याच्या भावाने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोहनसिंहला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 11/Mar/2025














