रत्नागिरी : शहरातील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36 रा कारवांचीवाडी) हा गंभीररीत्या जखमी झाला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर अर्धा तास होऊनही अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली नव्हती.
कोकण नगर वरून मारुती मंदिर ज्या दिशेने येणाऱ्या सिटी बस आणि दुचाकी स्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता. यावेळी हा अपघात घडला. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या हाताला व पायाला मार लागला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 11-03-2025














