रत्नागिरी : इन्फिगो फाउंडेशनतर्फे मुंबईच्या प्रसिद्ध ज्वेलरी मेकर्स अश्विनी करकरे व मेधा खांडेकर यांनी साळवी स्टॉप येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये शहरी व ग्रामीण भागातील महिलांना ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉ. शीतल साळुंखे, डॉ. तन्वी कुरेशी आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे उपस्थित होत्या. डॉ. शीतल यांनी सर्व महिलांना डोळ्यांसंदर्भातील उपयुक्त माहिती दिली. करकरे यांनी महिलांना प्रोत्साहन देत उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाध्ये हार, बांगड्या, कानातले यांचे उत्तम प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व महिलांनी स्वतः वस्तू बनवल्या. पुढे देखील अद्ययावत प्रशिक्षणाचा कार्यक्रम इन्फिगो फाउंडेशनतर्फे व करकरे यांनी घ्यावा, असा आग्रह धरला. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुन्हा कार्यक्रम घेऊ, असे इन्फिगो फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. या सामाजिक उपक्रमास प्रतिसाद दिल्याबद्धल डॉ. अश्विनी रहाटे, श्रद्धा भागवत, नूतन सुर्वे व सर्व टीमने आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 11-03-2025














