‘संगमेश्वर रेल्वे थांब्या’कडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

संगमेश्वर : कोकण रेल्वे प्रशासनाने कर्नाटक राज्यातील कुमठा रेल्वेस्थानकात हिस्सार-कोईम्बतूर एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. कुमठा स्थानकावर थांबा दिला असला, तरीही दीड वर्षापासून मागणी करत असलेल्या संगमेश्वरकरांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे,असे संदेश जिमन आणि अन्य सहकाऱ्यांनी सांगितले.

संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा, अशी मागणी गेली दीड वर्षे सुरू असून, कोकण रेल्वे प्रशासन फक्त कारणे देत आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही थांबे मिळत नसतील, तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्न जिमन यांनी उपस्थित केला आहे.

कोकण रेल्वेच्या उभारणीत ज्या राज्यांचा आर्थिक सहयोग कमी त्याच राज्यांना कोकण रेल्वेकडून झुकते माप मिळत आहे. या ठिकाणी एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले, तर निश्चितच पर्यटनाला चालना मिळू शकते, असे जिमन यांचे मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी, असे आवाहन जिमन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 11/Mar/2025

Infigo eyecare