चिपळूण : कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते चिपळूण पोलिस ठाण्यातील अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे (व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम) उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा वार्षिक तपासणीसाठी पोलिस महानिरीक्षक संजय दराडे चिपळूण येथे आले होते. त्यांच्या स्वागताची तयारी गेले काही दिवस सुरू होती. यावेळी गुन्ह्यासंदर्भातील माहितीच्या नोंदीसह त्याबाबतचे कागदपत्रे अपडेट ठेवण्यावर पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा भर होता. शुक्रवारी पोलिस ठाण्यात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे दाखल झाले. त्याच्या हस्ते अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे (व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम) उद्घाटन करण्यात आले.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागिय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक दराडे यांनी कायदा, सुव्यवस्था, गुन्ह्यासंदर्भातील माहिती घेतली. तसेच चिपळूण ह पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 11/Mar/2025














