कर्दे-नरवण मार्गावर गावठी दारू बाळगणाऱ्या दोघांविरोधात कारवाई

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील कर्दे ते नरवण जाणाऱ्या रस्त्यालगत तसेच खोडदे पुलाजवळ बेकायदेशिरपणे गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या दोघांविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार १० मार्च रोजी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ५.४० वा. कालावधीत करण्यात आली. संतोष प्रमोद जाधव (४४, रा. नरवण भंडारवाडा, रत्नागिरी) आणि प्रदीप पांडुरंग साळवी (६०, रा. खोडदे, गुहागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. यातील संतोष जाधव हा आपल्या ताब्यात ७५० रुपयांची ७लिटर तर प्रदीप साळवी आपल्या ताब्यात ५५० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी घेऊन असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 12/Mar/2025