संगमेश्वर : कुचांबे येथे फोर्टिफाईड तांदूळ प्रशिक्षण

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील आदर्श केंद्र शाळेत महिला दिनानिमित्त प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना अंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ केंद्रस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी कुचांबे केंद्रीय प्रमुख बाळासाहेब पवार यांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे काय, त्याचे फायदे, तसेच तो कसा वापरावा याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण आणि व्हिडीओ प्रेझेंटेशन करण्यात आले. प्रशिक्षणास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकिता कदम, राजीवली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटोळे, कुंभारखणी बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऐश्वर्या गावडे, तसेच तिन्ही शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, स्वयंपाकी व मदतनीस, शिक्षक आणि केंद्र प्रमुख बाबासाहेब पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन रामनाथ गायकवाड यांनी, रवी कवेत यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 12/Mar/2025