गुहागर : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांचा पाणलोट योद्धा पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते कारेकर यांचा गौरव करण्यात आला. आबलोली येथे पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रम तसेच जागतिक महिला दिन कार्यक्रमात वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समिती आबलोलीच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी विचारपीठावर जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीलम पालव, दिल्ली येथील भूमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ट श्वेता नारायण, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उपअभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 12/Mar/2025












