चिपळूण : श्री देव सोमेश्वर व करंजेश्वरी देवस्थानचा उद्या शेरणे कार्यक्रम

चिपळूण : ढोल-ताशाचा गजर व श्री देवीचा जयजयकार करत गोवळकोट-पेठमापवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ झाला.

कोकणातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पेठमाप येथे होणार आहे. शहरातील गोवळकोट येथील मंदिरापासून मिरवणुकीने मंगळवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता या शिमगोत्सवास प्रारंभ झाला. या वेळी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक सुरू झाली, या निमित्त देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत ही मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मशिदभेटीचा अनोखा कार्यक्रम झाला, चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली. पालखी पुन्हा मागे वळवून सहाणवाडी येथे होम लावला.

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, या ठिकाणी मानकरी जगताप कुटुंबीयांतर्फे पूजा झाला व त्यानंतर पालखीचे पेठमापुच्या दिशेने प्रयाण झाले.

दोन्ही पालख्या पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारत बुधवारी (ता. १२) पहाटे होम लावून दोन्ही पालख्या पेठमाप येथील सहाणेवर विराजमान होतील. १३ मार्चला दुपारपासून या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम होईल.

Infigo eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 12/Mar/2025