कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित करोडीतील दोन्ही बोगदे सोमवारी (ता. १०) सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले केले आहे. त्यामुळे शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर झाला आहे. टनेलमधील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरुपात जनरेटर ठेवला आहे.

कशेडीतील दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के. व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सुचित केले होते अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लावणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्णक्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की, नाही याबाबत सांशकता व्यक्त केले जात होते.

चाकरमान्यांच्या वाहनांची बेसुमार संख्या लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यात जनरेटरबी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वीत होईपर्यंत विजेचा अडथळा निर्माण झाल्यास जनरेटरवरच विद्युत पुरवठा करून बोगद्यातून पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विनाअडथळा वाहतूक
विजेसाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही बोगद्यात ११ केव्ही वीज उपलब्ध होईल यामुळे दोन्ही बोगद्यातून २४ तास विनाअडथळा वाहतूक सुरू राहून दोन्ही बाजूने वाहनचालकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल, असेही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 12/Mar/2025