गोगटे- जोगळेकर महाविद्यालय ‘रोबो रेस’ स्पर्धेत प्रथम

रत्नागिरी : प्रतिवर्षीप्रमाणे फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, रत्नागिरी येथे ब्रेनव्हेवज् २०२५ या तांत्रिक महोत्सवाचा एक प्रमुख आकर्षण ठरलेली रोबो रेस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत १९ संघांतील ९५ विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा प्रत्यय देत रोबोंची स्पर्धा अनुभवली.

स्पर्धेमध्ये लाइन फॉलोइंग आणि अडथळा टाळणाऱ्या रोबोंच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक संघाने स्वतः विकसित केलेल्या स्वयंचलित रोबोंच्या मदतीने दिलेल्या मार्गावर अचूकतेने धावण्याचे लक्ष्य ठेवले. प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये रोबोंच्या दिशा ओळखण्याची क्षमता आणि सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित अडथळे पार करण्याची कौशल्ये तपासण्यात आली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट रोबोंनी अचूकतेने मार्ग शोधत वेगाने आणि अडथळ्यांना न जुमानता धाव घेतली. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले. फिनोलेक्स अॅकॅडमीच्या द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल संघाने द्वितीय तर द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग संघाने तृतीय स्थान मिळवले, स्पर्धेचे मूल्यांकन प्रा. वृशाली निंबाळकर आणि प्रा. अमोल सुतार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य समन्वयक माधव सावंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर सुजय खेडेकर आणि ईशा कटके यांनी टेक सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 12/Mar/2025

Tata motars tiago