दापोली : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धन मोहिमेला चांगलेच बळ मिळताना दिसत आहे. किनाऱ्यावरील कासव मित्रांचे सहकार्य आणि नागरिकांमध्ये ऑलिव्ह रिडले कासवांबाबत होत असलेली जनजागृती हे कांदळवन विभागाचे यश मानले जात आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवर या वर्षी ऑलिव्ह रिडले कासवांची १००५ घरटी आढळली आहेत. या घरट्यातून ९९ हजार ६३२ अंडी संरक्षित करण्यात आली. यातून २४२५ कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. कासवांच्या अंड्याची चोरी होऊ नये यासाठी कासव मित्र कांदळवन विभागाच्या मदतीने रक्षण करत आहेत. तर अनेक तरुण कांदळवन मोहिमेत सहभाग घेऊन मदतीचा हात देत आहेत. अंड्यातून बाहेर आलेली कासवांची पिल्ले ज्या वेळेस समुद्रात झेपावतात त्या वेळेचा नजारा बघण्यासारखा असतो.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मध्ये हरिहरेश्वर १७ घरटी १६१७ अंडी, दिव्य आगार १२ घरटी १३३६ अंडी, मरल ९ घरटी ७६१ अंडी, संरक्षित करण्यात आली आहेत. यातील २ पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. अलिबाग मध्ये किहीम येथे एक घरटे संरक्षित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवघड मुणगे ७६ घरटी ६७७३ अंडी, कुणकेश्वर ९ घरटी ९७६ अंडी, या संरक्षित घरट्यातील २६९ पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.
रत्नागिरीच्या दापोलीत आंजर्ले २७ घरटी २९८४ अंडी, दाभोळ १२२ घरटी ११७३७ अंडी, केळशी, ३५ घरटी ३६९१ अंडी, आडे ५ घरटी ५०५ अंडी, कर्दे १० घरटी १११९ अंडी, कोळथरे ५१ घरटी ५२१२ अंडी, लाडघर ८ घरटी ८२१ अंडी, मुरुड १६ घरटी १६५४ अंडी, या संरक्षित घरट्यातून दापोलीत ३८२ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
गुहागरमधील गुहागर १७९ घरटी १७,९७३ अंडी, गुहागर बाग ११० घरटी १०,५५६ अंडी, रोहिले २२ घरटी २०२६ अंडी, तवसाल २० घरटी २०४० अंडी या संरक्षित घरट्यातून ८७३ पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. मंडणगड वेळास मध्ये ५५ घरटी आणि ५६७९ अंडी संरक्षित आहेत. त्यातील १६२ पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. राजापूर मध्ये अणसुरे २२ घरटी २०३९ अंडी, माडबन ५४ घरटी ५६२३ अंडी, वेत्ये ५० पिल्ले, जैतापूर ५ घरटी ४५५ अंडी, या संरक्षित घरट्यातून ५६७ पिल्ले समुद्रात झेपावली तर रत्नागिरीतील गावखडी ९४ घरटी ९९९६ अंडी, मालगुंड ४६ घरटी ४०५९ अंडी संरक्षित होती यातील १७० पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. ही माहिती कांदळवन विभागाचे रत्नागिरी जिल्हा परिक्षेत्र वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 12/Mar/2025














