युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणास बेड्या

खेड : शहरातील एका २८ वर्षीय युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील प्रतिक संजय शिंदे (२४) यास येथील पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असतां संशयिताची ३ दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही घटना ऑक्टोबर २०२३ ते १० मार्च २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडित युवतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २ वर्षापूर्वी युवतीची संशयिताशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाल्यानंतर इन्स्ट्राग्रामवर मॅसेजद्वारे बोलणे सुरू झाले. २०२३च्या नवरात्रोत्सवात दोघांची खेडमध्ये प्रत्यक्ष भेटही झाली. मार्च २०२४ मध्ये दोघे लाडघर येथे फिरायलाही गेले होते. यानंतर व्हॉटस्अॅप व्हिडिओ कॉलवर वेळोवेळी बोलणे सुरू असताना अश्लिल शब्द वापरत विनयभंग केला. संशयिताशी व्हॉटस्अॅपद्वारे चॅटिंग व व्हिडिओ कॉलवर बोलायचे युवतीने कमी केल्यानंतर तिचा अश्लिल फोटो व्हॉटस्अॅपवर स्टेटसूला ठेवत बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जातीवाचक शिवीगाळ करत ब्लॅकमेल केल्याचेही पीडित युवतीने पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर तरुणास पोलिसांनी अटक केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 12/Mar/2025