संगमेश्वर : कळंबस्ते मोहल्ला येथील शाळा परिसरात तंबाखू विक्री; गुन्हा दाखल

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथील शाळेच्या आवारात तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एकूण ७४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई मंगळवार ११ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा. सुमारास करण्यात आली. शहबाज शाबान काळसेकर (वय २६, रा. कळंबस्ते मोहल्ला, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुकानदाराचे नाव आहे.

त्याच्या विरोधात महिला पोलिस नाईक क्रांती सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा कळंबस्ते मोहल्ला जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोरील १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत असताना ही मिळून आला. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 13/Mar/2025