जालगाव : दापोली तालुक्यातील मुरुड येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १२ मार्च रोजी घडली. दापोली तालुक्यातील मुरुड या गावातील नेत्रा निलेश बोवणे (वय १५) या अल्पवयीन मुलीने घराच्या वाशाला ओढणीने गळफास घेतला. मुलीला तिच्या काकांनी लोकांच्या सहाय्याने तत्काळ खाली काढून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 13/Mar/2025














