रत्नागिरी : ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक व पद्मभूषण सी. आर. व्यासांचे गुरू गायनाचार्य (कै.) पं. राजाराम बुवा नारायण पराडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित ‘स्वर वंदना’ मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम रंगला.

स्वर वंदना या शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत गायनाची श्रोत्यांना मेजवानी मिळाली. तब्बल चारशे ते साडेचारशे श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. बऱ्याच दिवसांनी श्रोत्यांना अशी पर्वणी लाभल्याचे अनेक रसिकांनी सांगितले.
मैफलीमध्ये (कै.) राजारामबुवांचे चिरंजीव सूरमणि पं. श्रीपाद पराडकर, त्यांची नात दीपा पराडकर-साठे, नातू पं. ललित पराडकर आणि रत्नागिरीच्या गायिका मुग्धा भट-सामंत यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीते ऐकवली. हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ अद्वैत मोरे व निवेदन दीप्ती कानविंदे यांनी केले. संचालन व लेखन प्रदीप तेंडुलकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 13/Mar/2025
