गुहागर : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला गुरुवार दि. 13 मार्च पासून सुरुवात होत आहे. या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरणार आहे. त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे, देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात. या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून गावभोवणीसाठी बाहेर पडतात. तसेच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात. यावेळी आंब्याचे झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे. यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 13/Mar/2025














