गुहागर : आबलोली येथे हळद लागवड प्रशिक्षण

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथे नुकतेच हळद लागवड प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांनी उपस्थितांना एसके-४ हळदीच्या वाणाविषयी माहिती देत अन्य शेतकऱ्यांनीही हळद लागवडीमध्ये प्रगती करावी, असे आवाहन केले.

यावेळी माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात हळद लागवडीसाठी बियाणे निवड, बियाणे साठवणूक, हळद लागवड, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कीड-रोग नियंत्रण, हळद लागवडीला पावसानंतरचे पाणी व्यवस्थापन, हळद काढणी, कापणीनंतर प्रक्रिया या बाबतचे मार्गदर्शन सचिन कारेकर यांनी केले. कोकणातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 14/Mar/2025