रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी ३३ लाख

रत्नागिरी : फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा राज्यातील ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४ हजार ६७० लाख रुपये शासनामार्फत जमा करण्यात आले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५०३ शेतकऱ्यांना १ कोटी ३३ लाखांचा लाभ देण्यात आला आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नव्हते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६ कोटी ७० लाख रुपये प्रोत्साहनपर म्हणून १ ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात आले.

जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत शाले आहेत, त्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या योजनेत २०१७-१८, २०१८- १९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली आहे अशा एकूण १४ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण ५ हजार ३१० कोटी रुपये रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 05/Oct/2024