संगमेश्वर : जुगार खेळणाऱ्या पाचजणांवर गुन्हा

रत्नागिरी : संगमेश्वर बाजारपेठेत जुगार खेळणाऱ्या ५ जणांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १२ मार्च रोजी दुपारी करण्यात आली. गौरव शेखर सुर्वे (३९), राकेश शिवराम घाग (४६), गौसिध्दीन हुसेन कापडी (६१), यासिन कासम सनगे (६४), सज्जाद हमीद शाह (४८) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल गिरीजाप्पा धोंडीराम लोखंडे यांनी तक्रार दिली आहे. यातील गौरव व राकेश हे दोघे लोकांकडून रक्कम स्वीकारुन मटका जुगार खेळ चालवत होते. तर अन्य त्याठिकाणी मटका खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 15/Mar/2025

Tata altroz