खेड : भोस्ते घाटात ट्रकचा अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटामध्ये लोटे येथून मुंबईच्या दिशेने रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असणारे संरक्षण कठडा तोडून घाट दरीत कोसळता कोसळता बचावला; मात्र या ट्रकमधून वाहतूक होत असलेला रासायनिक घनकचरा महामार्गावर पसरल्याने परिसरात उग्र वास पसरला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर या अपघातामुळे काहीअंशी परिणाम झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 19/Mar/2025