रत्नागिरी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत ५२७ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण

रत्नागिरी : मजुरांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण व्हावे, म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचा गोठा उभारण्याची सुविधा आहे. त्यामध्ये या योजनेंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात ५२७ गोठे बांधण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर होऊ नये तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचवावे, म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, वृक्षलागवड, जनावरांसाठी गोठे बांधणे अशी विविध कामे हाती घेण्यात येतात. त्यातून मजुरांना रोजगार तर मिळतो शिवाय शेतकऱ्यांनाही लाभ होत आहे.

शासनाकडून दोन ते सहा जनावरांचा गोठा बांधकाम करण्यासाठी ७७ हजार १८८ रुपये अनुदान देण्यात येते. तसेच ६ ते १२ जनावरांसाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच १ लाख ५४ हजार रुपये, तर १३ पेक्षा जास्त जनावरे असतील तर २ लाख ३१ हजार ५६४ रुपये अनुदान देण्यात येते. या गोठ्यामुळे शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरीत्या करता यावे यासाठी त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 24/Mar/2025

Arihant 1