गुहागर : कोतळूक येथे आजपासून कबड्डी स्पर्धा

गुहागर : तालुक्यातील कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमनाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी यांच्या वतीने गुहागर तालुकास्तरीय मातीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दि. २७ व २८ मार्च रोजी होईल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १० हजार रु. व चषक, द्वितीय ५ हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघांना चषक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 27/Mar/2025