चिपळूण : पॉवर हाऊस परिसरात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण : शहरातील पॉवर हाऊस परिसरात एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी आहे. सकाळी ८ वाजण्याच्या वसुमारास ही घटना घडली. राम काशिनाथ पाटकर (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नयनेश तांबडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राम पाटकर हे पॉवर हाऊस परिसरात राहात होते.

त्यांच्या राहत्या घरच्या वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागे काय कारण हे अद्याप स्पष्ट झाले नसून चिपळूण पोलिसांनी याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 27/Mar/2025