चिपळूण : कुशिवडे येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील कुशिवडे शिंदेवाडी येथे एका प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अनिल गंगाराम शिंदे (४५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना दि. २७ मार्च रोजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत सावर्डे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मृत अनिल शिंदे यांनी दारूच्या नशेत घराच्या लोखंडी भालाला नायलॉन दोरीने बांधून खुर्चीवर चढून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 29/Mar/2025

Tata harrier