मालगुंड शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड शाळेसमोरी सार्वजनिक रस्त्यावर तसेच जयगड ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २७ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वा. कालावधीत करण्यात आली आहे.

अरुण गणपत गवाणकर (५६, रा. उंडी कृणबीवाडी, रत्नागिरी) आणि शरद अशोक मयेकर (४६, रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील अरुण हा जयगड ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर तर शरद हा मालगुंड शाळेच्या समोरील रस्त्यावर विनापरवाना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 29/Mar/2025