जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेला अरिहंत बाबासो बेडक्याळे याची राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल त्याचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कौतुक कौतुक केले आहे. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाने त्याचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 29/Mar/2025














