लांजा : तालुक्यातील निवसर बाग येथील काजळी नदीपात्रात वृद्धाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याची खबर रेहाना रमजान हाजू (वय ४०, रा. निवसर बाग) यांनी पोलिसांना दिली. रेहाना हाजू या शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास काजळी नदीवर चटई धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना नदीच्या पाण्यात एका पुरुषाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
ते घटनास्थळी दाखल झाले. तपासात तो मृतदेह सुभाष काशीराम राणे (वय ६७, रा. कल्याण ठाणे, मूळ रा. वाघेरी कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग) यांचा असल्याचे उघड झाले. या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 31/Mar/2025














