दापोली : गटशिक्षणाधिकारी घाग यांच्या कार्यकाळानंतर दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाचा कारभार हा अनेक वर्षे प्रभारीच राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभारी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या कडील गटशिक्षणाधिकारी पदभार काढून तो विस्तार अधिकारी रामचंद्र सांगाडे यांच्याकडे सोपवण्यात आला. हा खांदेपालट एका प्रभारीचा कार्यभार काढून दुसऱ्या प्रभारीकडे सोपवण्याचा सोपस्कार पार पडला.
तत्कालीन गट गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांचे नंतर अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाची धुरा ही यशस्वीरित्या सांभाळली होती. व्हिजन दापोली या पंचायत समिती उपक्रमाने दापोलीत शिक्षण विभागाला नवा आयाम मिळाला. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण घेणारी मुले ही तालुका, जिल्हा आणि राज्य आशा ठिकाणी विविध खेळात आणि स्पर्धा परीक्षेत चमकली.
विविध स्पर्धा परीक्षा, आशा प्रत्येक उपक्रमांत चमकदार कामगिरी दिसली. त्यामुळे बळवंतराव यांचा जिल्हास्तरावर सन्मान झाला. मात्र असे असताना त्यांना पदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे बळवंतराव हे राजकीय विरोधाचे बळी तर ठरले नाहीत ना? अशी चर्चा सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 31/Mar/2025














