खेड : गंभीर भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड : तालुक्यातील वेरळ येथे चुलीवर शेकोटी घेत असताना भाजून जखमी झालेल्या वृध्देचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

जयश्री बबन घोरपडे (७०, रा. वेरळ, खोपी फाटा खेड) असे वृद्धेचे नाव आहे. शुक्रवार, ७मार्च रोजी सकाळी त्या घरी एकट्याच असताना चूल पेटवून त्याकडे पाठ करुन शेकोटी घेत होत्या.

त्यावेळी त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 31/Mar/2025