खेड : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये शहरातील १ ते २५ वॉर्डात खेड नगर परिषद कार्यालयाने थकीत मालमत्ता करधारक व पाणीपट्टी करधारक यांच्यावर मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या आदेशाप्रमाणे वसुलीची मोहीम तीव्र केली आहे.
या वसुलीसाठी शहरातील १४ मालमत्ता जप्त, तर १२० नळ जोडणी तोडण्यात आली आहे. खेड शहरात थकीत कर वसूल करता यावा, यासाठी कारवाईसाठी विशेष पथक प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, नागेश बोंडले, गंगाधर गायकवाड, उमेश रेपाळ, राजेंद्र तांबे, संदेश मोहिते, परशुराम पाथरे, सूरज शिगवण, आकाश जाधव, सूरज उपावले यांना कार्यरत केले आहे.
या पथकाने अद्यापपर्यंत खेड शहरातील १४ मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई तसेच १२० नळ कनेक्शनधारकांवर थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई सर्व सुट्टीच्या दिवसांसह सुरु राहणार आहे. नागरिकांनी कराचे वसुलीसाठी व पाणीपट्टी वसूलीसाठी त्वरित कराचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करुन सहकार्य करावे व पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन खेड नगर परिषदेने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 01/Apr/2025














