रत्नागिरी : राज्य वैद्यकीय परिषद, मुंबईच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिलला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई निवडणूक सहायक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
राज्य वैद्यकीय परिषद, मुंबईच्या निवडणुकीकरिता जिल्ह्यासाठी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार ४१ असून त्यांपैकी ९ उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे.
१ ते २५० मतदारांना मतदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होडेकर रोड, पटवर्धनवाडी येथील शरीररचना शास्त्र विभागाच्या खोली क्र.१ येथे मतदान केंद्र निश्चित केले आहे. २५१ ते ५०० अशा अडीचशे मतदारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खोली क्र. २ मध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 01/Apr/2025














