चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. त्यानंतर विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंदू बांधवांनी मशिदीच्या बाहेर मुस्लिम बांधवांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद निमित्त एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजा (उपवास) पाळला जातो. या महिन्यात दानधर्म करणे पवित्र मानले जाते, आजच्या दिवशी या रोजाची उपवासाने सांगता होते. काल सकाळी ईद ची नमाज पठण करण्यासाठी जिल्ह्यातील ईदगा आणि मशीदींमध्ये मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. यावेळी लहानग्या मुलांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून मुस्लिम ईद-उल-फित्र हा रमजान महिन्याचा शेवट असतो, जेव्हा ३० दिवसांच्या उपवासानंतर मुस्लिम समुदाय अल्लाहचे आभार मानण्यासाठी ईदची नमाज अदा करतात. ईदच्या दिवशी हिंदू बांधव मशिदीच्या बाहेर जमतात आणि नमाज पठण कडून येणाऱ्या मुस्लिम बांधवांना अलिंगन देत ईद शुभेच्छा देतात.
ही परंपरा जिल्ह्यात यावर्षीही कायम ठेवण्यात आली. रविवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर घराघरात ईदची लगबग सुरू झाली. नवीन कपडे आणि साहित्य खरेदीसाठी मागील आठ दिवसापासून लगबग सुरू होती. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू होत्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची बाजारपेठेत गर्दी होती. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा दिला जात होता. गोडधोड पदार्थाबरोबरच बिर्याणी, पुलावाचा आस्वाद देखील मुस्लिम बांधवांकडून दिला जात होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 01/Apr/2025














