रत्नागिरी : हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात एकाच वेळेस सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला. जिल्ह्यात ७० ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात झाला.
देशभरातील श्री हनुमान मंदिरे, श्रीराम मंदिरे यांसह हिंदू मंदिरे, धार्मिक स्थळांवर २० हजारांहून भाविक, साधक, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. यात हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. त्यांचा या पठणाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभाग होता.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुमारे ७० ठिकाणी कार्यक्रम यशस्वी झाला. २९ मार्च रोजी शनिगोचर अर्थात श्री शनिदेवाने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला.
श्री हनुमान चालिसा पठणावेळी श्री हनुमंत आणि श्री शनिदेव यांच्या चरणी हिंदू राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेकांनी आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला. तसेच राष्ट्र आणि धर्म कार्य करताना अशा उपक्रमांतून ऊर्जा मिळाल्याचे मनोगत भाविकांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 01/Apr/2025














