रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांच्या आजारपणात त्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. विठ्ठल मंदिर संस्था ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर येथे ७० वर्षांवरील ७० गरजूंना कार्डचे वाटप करण्यात आले.
याला ज्येष्ठ नागरिकानी प्रतिसाद दिला. ज्येष्ठ कट्टा संयोजक सुरेश लिमये, सुरेंद्र घुडे, विठ्ठल मंदिर संस्थेचे खजिनदार प्रमोद रेडीज, अरविंद वांदरकर, शिरीष वारंग, सुरेंद्र शेट्ये, दत्ताराम लिंगायत, अविनाश गावंडे यांनी सहकार्य केले. अनेकांना हा विषय उशिरा कळल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा एकदा अशा प्रकारे शिबीर आयोजित करण्यात येणार येईल, असे सुरेश लिमये, सुरेंद्र घुडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 01/Apr/2025














