दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडट ही मानद उपाधी जाहीर केली असून, भारत सरकारच्या राजपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे शिक्षणही कोकण कृषी विद्यापीठामध्ये झाले असून शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) चे ३ वर्ष छात्र (कॅडेट) होते. त्यांनी १९७९ ते १९८२ या काळात सिनिअर अंडर ऑफिसर म्हणूनही काम केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेत आल्यावर त्यांनी ७ वर्षे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल संरक्षण मंत्रालयाने घेऊन त्यांना ‘कर्नल डॉ. संजय भावे कमांडट’ ही मानद उपाधी जाहीर केली. एप्रिल महिन्यात एनसीसीचे मुंबई येथील अतिरिक्त महासंचालक, कोल्हापूर येथील ब्रिगेडियर तसेच बटालीअन कर्नल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ही उपाधी प्राप्त करणारे डॉ. संजय भावे हे या विद्यापीठाचे चौथे कुलगुरू असून, यापूर्वी डॉ. विजय मेहता, डॉ. शंकरराव मगर व डॉ. संजय सावंत यांना ही उपाधी प्रदान करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 01/Apr/2025














