रत्नागिरी : मार्च अखेरमुळे सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेची कार्यालय सुरू

रत्नागिरी : सन २०२४-२५ च्या वर्ष अखेरच्या कामकाजासाठी दि. २९ ते ३१ मार्च शासकीय सुट्टीच्या दिवशी रत्नागिरी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व खाते प्रमुख व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवारी सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील सर्व कार्यालये सुरु होती.

सन २०२४-२५ वित्तीय वर्ष अखेरीस असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना शासनाकडून अनुदान वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध होणारा निधी खर्च करण्याच्या दृष्टीने बीडीएस प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे, बिले तयार करणे, कोषागार कार्यालयास बिले मुदतीत सादर करणे, त्यानुसार निधी उपलब्ध करून घेणे व तालुकास्तरावर अनुदान वितरण करणे, झेडपी एफएमएस प्रणालीची सर्व कामे विहीत वेळेत होणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने दि. २९ ते ३१ अखेर शासकीय सुट्टीच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेली सर्व कार्यालये, पंचायत समित्या, उपविभाग व इतर कार्यालये नियमीतपणे सुरू राहतील, असा आदेश वरिष्ठांनी काढला. सोमवारी सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून सन २०२४- २५ वित्तीय वर्षाची कामे करताना दिसत होते. तसेच ठेकेदारांनीही झेडपीत बिले काढण्यासाठी गर्दी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 01/Apr/2025