रत्नागिरी : खातू नाट्यगृहामध्ये २९ मार्च रोजी शिक्षक पालक सभा झाली. या सभेला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश शेवडे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केला जाईल या बदलांना पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
इयत्ता बारावीच्या दृष्टीने वर्षभराचे नियोजन याबद्दलची माहिती पालकांना मिळावी व पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम, रत्नागिरी पॅटर्नच्या नियोजनाबद्दलची माहिती, विविध सराव परीक्षा संदर्भातील नियोजन, स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, रेमिडियल विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना अशा विविध उद्दिष्टांची पालकांना माहिती मिळावी, यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीलाच ही सभा आयोजित केली होती.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयात राबवलेल्या उपक्रमाबद्दल पालकांना माहिती दिली. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रा. महेश नाईक, प्रा. विद्याधर केळकर, कर्मचारी आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 02/Apr/2025














