पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीची ग्रामदेवता जाकादेवीची पालखी शिमगोत्सवानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी गावखडी गावात भक्तभेटीसाठी बाहेर पडली आहे.
गावखडीची ग्रामदेवता जाकादेवीची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पालखी प्रथेप्रमाणे श्रीदेव रामेश्वर मंदिर, स्थंबदेव या देवतांच्या भेटीला नेण्यात आली. त्यानंतर ब्राह्मणवाडी, तोडणकरवाडी, पेटकरवाडी, मुडेवाडी, तरयेवाडी, शिवगणवाडी, सुतारवाडी, कुंभारवाडी, बंडबेवाडी, नानरकरवाडी, पवारवाडी आदी वाड्यांतून पुन्हा गुरववाडी येथील मंदिरात स्थानापन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर तोडणकर यांनी दिली.
या पालखीत जुगादेवी, मानूबाय, जाकादेवी, रामेश्वर या देवतांच्या मूर्ती आहेत. या पालखीसोबत गावखडीतील प्रमुख मंडळी, भक्तगण, बारा वाड्यांतील मान्यवर उपस्थित आहेत. देवीची पालखी ढोलताशांच्या गजरात घरोघरी भक्तभेटीसाठी जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 02/Apr/2025














