देवरूख : उन्हाळ्याचे दाहकता वाढू लागल्या बरोबरच टंचाईचे सावट संगमेश्वर तालुक्यावर पडू लागले. तालुक्यातील ३ गावांनी पंचायत समिती विभागाकडे टँकरची मागणी केली आहे. तालुक्यातील पाचांबे ग्रामपंचायतमधील नेरदवाडी, जखीण टेप व कुंभारखणी बुद्रुक गावातील मधली वाडी व तांबळवाडी तसेच पिरंदवणे गावातील घेवडेवाडी या गाव व वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत.
या गावामधून ग्रामपंचायतद्वारे टँकरचे प्रस्ताव तयार करून पंचायत समिती प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच या गाव व वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतर टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाने दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 03/Apr/2025














