रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात लांजा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाचा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रशस्त शालेय परिसर, सुसज्ज इमारत, पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, परसबाग, विविध स्पर्धा परीक्षेतील यश, राज्यस्तरीय खेळाडू निर्माण करण्याची परंपरा, अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज संगणक लॅब, गुणवत्तापूर्ण शिक्षण व भौतिक सुविधा, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातील संशोधनासाठी शिक्षकांची निवड आदींच्या निकषावर पेडणेकर विद्यालयाने तालुकास्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे.
शाळेतील शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, लांजा केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर, स्थानिक कमिटी उपाध्यक्ष संजय पाटोळे, नंदकुमार आंबेकर आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंद पेडणेकर, प्रमुख कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, शाळा समिती चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, आजी माजी विद्यार्थी व पालक आदींनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 03-04-2025














