राजापूर पंचायत समितीचा कारभार प्रभारींच्या हाती

राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभाराचे प्रमुख असलेले गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पदासह अन्य प्रमुख प्रशासकीय पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार वर्षानुवर्षे प्रभारींच्या हाती आहे.

विस्तारलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार पंचायत समितीच्या माध्यमातून सांभाळला जात आहे. या कारभाराला गती मिळण्यासाठी पंचायत समितीतील प्रमुख पदे कार्यरत असणे अपेक्षित असते; मात्र, राजापूर पंचायत समितीचा कारभार वर्षानुवर्षे प्रभारींच्या हाती आहे. गटविकास अधिकारी पद गेले सात महिने रिक्त आहे. कृषी अधिकारी पद सव्वा वर्षे, गटशिक्षणाधिकारी पद गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रिक्त आहे. अन्य पदांची त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कसरत
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी ९१ ग्रामपंचायत अधिकारी पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६४ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत असून, तब्बल २७ पदे रिक्त आहेत. काम करताना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यातून गावविकासाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रमुख रिक्त पदे

Ratnagiri Khabardar add image

गटविकास अधिकारी
कृषी अधिकारी
सहायक प्रशासन अधिकारी
सहायक लेखाधिकारी
उपअभियंता, बांधकाम विभाग
गटशिक्षणाधिकारी
ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कसरत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 05/Apr/2025