रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आता ‘सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकल’द्वारे गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे गणपतीपुळे पर्यटनस्थळाला पोलिसांचे सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे जीवरक्षक कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांकडून समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ठेवली जात आहे, परंतु आता याच जीवरक्षकांच्या जोडीला पोलिसांची ग्रस्त सुरू राहणार असल्याने समुद्रकिनाऱ्यावरीची सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी
पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून गणपतीपुळे समुद्र किनारी गस्तीसाठी दोन इलेक्ट्रीक सायकल गणपतीपुळे पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्या आहेत.
या सायकली समुद्रकिनाऱ्याच्या वाळूतून सहच फिरू शकतात. त्यामुळे गणपतीपुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावारील गस्त अधिक व्यापक बनली आहे. सध्या गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच गणपतीपुळे पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांच्या जोडीला कार्यरत असलेले होमगार्डही या इलेक्ट्रीक सायकलने गणपतीपुळे समुद्रकिनारी गस्त घालत असल्याचे चित्र दिसून येते. या समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडल्यास आता सहजगत्या या इलेक्ट्रीक सायकलने पोलिसांना पोहचता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 07/Apr/2025














