रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) यांच्या प्लेसमेंट सेल आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे शनिवारी (ता. १२) सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मुलाखती (कॅम्पस ड्राईव्ह) चे आयोजन केले आहे.
या ड्राईव्हमधून ऑपरेशन्स मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फायनान्स एक्झिक्युटिव्ह आदी जागा भरण्यात येणार आहेत. महाविद्यालयातून कॉमर्स विभागातून बीकॉम, बीएएफ, बीएमएस, एमकॉम आदी पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी या संधीचा लाभघेऊ शकतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला कागदपत्रांसह नियोजित वेळेत महाविद्यालयाच्या वाणिज्य इमारतीत उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रूपेश सावंतदेसाई आणि इन्फिगो लाइफ सायन्सेस प्रा. लि.चे सुशांत पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 08/Apr/2025














