सावर्डे येथे प्रौढाचा मृत्यू

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश हिरु जड्याळ (वय ५२, रा. कोसबी घानेकरवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जड्याळ हे दारूचे व्यसनी होते. ते सावर्डे येथे साणेजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या मुलाने याबाबत खबर दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेमधून सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 08/Apr/2025

Kohinoor furni.